मुंबई दि. ३१ (प्रतिनिधी ) : छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी ) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई येथून वीरेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वीरेंद्र मिश्रा यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यात चमकदार कामगिरी केलेली आहे.
गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्यात आल्या आहेत . यात छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेशावर चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे . त्यांना तघने येथे पोलीस आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण हे आयजी म्हणून कार्यरत असताना त्यांनी परिक्षेत्रातील ठाण्यांना दिलेल्या 'अचानक भेटी ' आणि त्यानंतरच्या 'घडामोडी ' याची परिक्षेत्रात चवीने चर्चा असायची. बीड जिल्ह्यातही त्यांनी काही ठिकाणी दिलेल्या 'भेटी ' चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यांना आता ठाणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी वीरेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वीरेंद्र मिश्रा यांची आयपीएस झाल्यानंतरची नियुक्ती बीड जिल्ह्यात झाली होती. त्या काळात त्यांची बीड जिल्ह्यातील कारकीर्द चमकदार राहिली होती. त्यामुळे आता त्यांची आयजी म्हणून झालेली नियुक्ती परिक्षेत्रासाठी महत्वाची असणार आहे.
--
कुमावत यांना अखेर नियुक्ती
परिवीक्षा कालावधीत आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे चर्चेत राहिलेले मात्र अंगच्या अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी पंकज कुमावत यांना अखेर नियुक्ती मिळाली आहे. अमरावती (ग्रामीण ) चे अपपात्र पोलीस अधीक्षक म्हणून कुमावत यांची नियुक्ती झाली आहे. केज येथे सहायक पोलीस अधीक्षक असताना त्यांनी जिल्ह्यात दरारा निर्माण केला होता. मात्र त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे बक्षीस देण्याऐवजी शासनाने त्यांना नियुक्तीपासून वंचित ठेल्याचे चित्र होते. आता उशिरा का होईना त्यांना नियुक्ती मिळाली आहे.
---
बातमी शेअर करा