बीड- जिल्हयातील शासकीय धान्य गोदामातील हमालांनी २४ जानेवारी पासून प्रातनिधीक बेमूदत धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केले धरणे आंदोलनाच्या सहाव्या दिवशी देखील शासनाने व जिल्हाधिकारी यांनी कृतीशील दखल घेतली नाही याचा निषेध महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी केला असून तातडीने दखल न घेतल्यास जिल्ह्यातील गोदामातील सर्व हमाल बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होतील असा इशारा दिला आहे.
पोहच व थेट वाहतूक धोरण संदर्भात काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात शुद्धीपत्राद्वारे ज्या-त्या गोदामातील पुर्वीपासून कार्यरत व माथाडी मंडळातील नोंदीत हमालाकडून काम करुन घेणे कंत्राटदारास बंधनकारक करण्यात यावे कारण थेट वाहतूक व द्वारपोहच मुळे गोदामातील हमालांचे काम कमी झाले हमालांना काम केलेतर पैसे मिळतात रोजगार खुपच कमी झालातर भविष्यात गोदामात काम करण्यासाठी हमाल तयार होणार नाहीत याकडे आम्ही संघटना म्हणून लक्ष वेधतो.व माथाडी कायद्यातील रोजगार नियमनाचा उद्देशही संपूष्टात येईल,माहे आक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२३ ची नियमित झालेल्या कामाची मजूरी माथाडी मंडळात द्यावी आनंदाचा शिधा किटची एक वर्षापासूनची थकीत संपूर्ण हमाली मिळावी.महागाई निर्देशांकाचा फरक मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ मिळावा.२०१२ ते २०१७ या कालावधीतील हमालीतील कमी आलेला फरक मिळावा , जिल्हयातील गोदामातील नियमित नोंदीत हमालांची वाहतूक कंत्राटदाराकडे माहे नोंव्ह-२०२३ व डिसेंबर २०२३ ची थेट वाहतूकी मध्ये केलेल्या कामाची हमाली माथाडी मंडळाकडे भरण्यात यावी.जाणीव पुर्वक एकाच वेळेस मालाची आवक-जावक करण्यात येऊ नये तसेच द्वार पोहोच टप्प्या-टप्प्याने जावक व्हावी.
गोदामाच्या ठिकाणी नागरी सुविधा मिळाव्यात.अ(1) व ब-2 व्यतरिक्त होणार्या कामाच्या हमाली मिळावी या मागण्यासाठी २४ जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करुन ६ दिवस होऊनही शासनाने व जिल्हा प्रशासनाने कृतीशील दखल घेतली नाही दरम्यान पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी धरणे आंदोलनास भेट दिली मात्र अद्याप ही मागण्याची पुर्तता झाली नाही सदर धरणे आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ बादाडे,सुभाष लांडगे ,केज,राम कुकर परळी वैजनाथ ,सुधाकर भास्कर शिरसाळा, मारुती इंगळे शिरूर कासार ,लालासाहेब दोनघहु अंबाजोगाई, वसंत चव्हाण पाटोदा ,विजयकुमार राऊत युसुफ वडगाव ,बाबासाहेब शिंदे आष्टी ,अरुण पवार घाटनांदुर ,इसराइल तलवाडा, महावीर चौसाळा ,गोरख पवार मादळमोही, संतोष भीमराव तुमारे उमापूर ,विलास हातागळे गेवराई ,देविदास हुके माजलगाव ,रवींद्र दिवटे कडा, किसन ढोरमारे बीड शेहर, पांडू काकडे बीड ग्रामीण, शेख जाहीर नेकनूर, राजेंद्र जाधव पिंपळनेर इ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.