बीड-पोलीस अधिक्षक पथक प्रमुख असलेल्या सपोनि गणेश मुंडे यांनी गेवराईत पुन्हा एकदा पत्त्याच्या क्लबवर छापा मारून मोठी कारवाई केली आहे. प्रजासत्ताक दिनी गणेश मुंडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी अठरा जणांना ताब्यात घेतले आहे. गेवराईत मागच्या आठ दिवसात दोनदा कारवाया झाल्यामुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गणेश मुंडे यांनी पोलीस अधिक्षक पथक प्रमुख म्हणून काम करताना अनेक मोठ्या कारवाया केल्या. विशेष करून वाळू माफियांवरील कारवाया त्यांच्या चर्चेत होत्या. आता मागच्या आठ दिवसात गेवराईतील पत्त्याच्या क्लबवर दोनदा एसपी यांच्या पथकाने छापा मारून कारवाया केल्याचे समोर आले आहे. आज गेवराईच्या अचानक नगर भागातील एका क्लबवर छापा मारल्यानंतर
सात मोटारसायकल, अठरा मोबाईल,55000 रू कॅश आणि अठरा आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.