Advertisement

 गेवराईमध्ये दोन गटात दगडफेक, तलवारबाजी

प्रजापत्र | Sunday, 21/01/2024
बातमी शेअर करा

 बीड - गेवराई शहरातील मोंढा भागात महामार्गावर लगत एक सलग १५ ते २० मांस विक्रीच्या खाटीक समाजाच्या दुकाना असुन मांस विक्रीसाठी दररोज येथे स्पर्धा लागली जात आहे. आज रविवार दि.२१ रोजी सकाळी १० सुमारास एक जणाने दुस- या दुकाना समोर कचरा टाकला. हा कचरा का टाकला या कारणावरुन बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारी, दगडफेक, तलवारबाजी, लाठ्या काठ्या, सत्तूर, कोयत्यामधे झाले. ५० ते ६० जण दगडफेक, तलवारबाजी एकमेकांवर करत हाणामा-या करत गेले.

 

 

या घटनेत तलवारींचा मार लागलेले तीन, दगडफेकीत पाच जण तर मुक्कामार लागलेल्यामध्ये १० ते १५ जण जखमी झाले असुन जखमीवर शासकीय व विविध खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स.पो.नि. जंजाळ पो.उप.नि.भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेत दंगल नियत्रंण पथकाला पाचारण केले. या पथकाने येथील जमावाला पिठाळून लावत या ठिकाणी तळ ठोकला आहे. याघटनेने मोंढा भागात तणाव निर्माण झाला असून महामार्गावरील वाहतूक दगडफेकीमुळे काही काळ ठप्प झाली होती. फिल्मी स्टॉईलने झालेल्या हाणामारीत घटनास्थळी दगडांचा खच दिसुन येत होता.

Advertisement

Advertisement