Advertisement

दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 14/01/2024
बातमी शेअर करा

पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने करकंब गावावर शोककळा पसरली आहे.गणेश नितीन मुरकुटे (वय ७ वर्ष), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ८ वर्ष) आणि मनोज अंकुश पवार (वय ११ वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही तीन लहान मुलं खेळता खेळता शेततळ्यामध्ये उतरली. तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

 

बाहेर गेलेली मुलं संध्याकाळ झाली तरी अजून कशी घरी परत आली नाहीत, म्हणून त्यांच्या आईवडिलांनी शोध सुरू केला. त्यावेळी घराच्या जवळच असलेल्या परदेशी या शेतकऱ्याच्या शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.मुलांना तातडीने करकंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिन्ही मुलं मृत झाल्याचे घोषित केले. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement