Advertisement

डॉ. शीतल आमटे आत्महत्याप्रकरणाला नवे वळण

प्रजापत्र | Wednesday, 30/12/2020
बातमी शेअर करा

चंद्रपूर : डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूला एक महिनाभर उलटून गेला आहे. सुरुवातीला अगदी जलद गतीने चाललेला तपास आता मात्र संथ गतीने चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष उघड करण्यात आला.

     पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. मात्र यात पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.जून 2020 मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा नवी अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.डॉ. शीतल आमटे यांनी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मसिस्टकडून इंजेक्शन्स मागवली होती. ही इंजेक्शन्स अ‍ॅनेस्थेशिया श्रेणीतील आहेत. शीतल यांनी मागवलेल्या पाच इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते, असे यापूर्वी समोर आले होते.

 

दरम्यान अद्याप टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा प्रयोगशाळा अहवाल प्रलंबित आहे. त्याशिवाय व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत आहेत. विविध अहवाल अद्याप प्रतिक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Advertisement

Advertisement