राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. मनी लॉंन्ड्रीग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना सहा महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा दिलासा मिळाला आहे. सध्या नवाब हे गेल्या दोन महिन्यांच्या जामिनावर आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन ६ महिन्यांनी वाढवला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन देण्यात आला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात होते. परंतु, तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना २ महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामीनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करत सहा महिन्यांसाठी जामीन दिला आहे.