बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने काल महत्वपूर्ण निकाल दिला. सुप्रीम कोर्टाकडून दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या निकालाने सामान्यांना आधार मिळाल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
"काल सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला. बिल्कीस बानो प्रकरणात हा निकाल आहे. त्याची पार्श्वभूमी गुजरातची आहे. कोर्टानं स्पष्ट भूमिका घेतली. सामान्य माणसाला आधार द्यायचं काम या निर्णयानं मिळेल अशी अपेक्षा आहे," असे शरद पवार म्हणाले.
बातमी शेअर करा