बीड-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या दुकानांचे बोर्ड वाहतूक पोलिसांकडून आज (दि.५) फाडण्यात आले. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांना कोणतीही सूचना न देता पोलिसांनी ही कारवाई केल्याचे ट्रॅव्हल्स मालकांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या या मुजोरपणाची बीड शहरात मोठी चर्चा रंगली असून ट्रॅव्हल्स संघटनेचे पदाधिकारी पोलीस अधिक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मागच्या अनेक वर्षांपासून येथे कार्यालय थाटण्यात आली होती.या ट्रॅव्हल्सवाल्यांनी आपल्या कार्यालयाचा बोर्ड रस्त्यावर ठेवल्यामुळे वाहतूकीसाठी मोठा अडथळा येतं असल्याचे कारण पुढे करत आज सकाळी वाहतूक पोलिसांनी अनेक ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाचे बोर्ड फाडून टाकले. पोलिसांच्या या मुजोरपणामुळे ट्रॅव्हल्स संघटना आक्रमक झाल्या आहेत.कोणतीही कल्पना न देता पोलिसांनी थेट बोर्डाच फाडून टाकल्याने संताप व्यक्त करण्यात येतं आहे. वाहतूकीसाठी अडचण होती तर दांडात्मक करावाया करा मात्र असली दंडेलशाही आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा ट्रॅव्हल्स संघटनेच्या वतीने देण्यात येतं आहे.
नगरपालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
ट्रॅव्हल्सवाल्यांवर आजची कारवाई नगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक वेळा सूचना देऊन ही ट्रॅव्हल्सवाले आपले बोर्ड रस्त्यावरच ठेवत होते. ज्यामुळे वाहतूकीसाठी मोठा अडथळा होतं असायचा. वारंवार सूचना देऊन ही सुधारणा होतं नसल्याने आज ही कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी 'प्रजापत्र'शी बोलताना म्हटले आहे.