Advertisement

तेलगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

प्रजापत्र | Thursday, 04/01/2024
बातमी शेअर करा

धारूर-   तेलगाव येथे रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच ठिकाणी चोर्‍या केल्या. एका ठिकाणी एका व्यक्तीस मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत सदरील व्यक्ती जखमी झाल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह काही नगदी रक्कम लुटून नेली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

तेलगाव येथील नामदेव जनार्धन लगड यांच्या घरी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत त्यांना दगडाने मारहाण केली. यात ते जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी आजुबाजुच्या चार ते पाच ठिकाणी चोर्‍या केल्या. ईश्‍वर इखे यांच्या घरी चोरी करून त्यांचा मोबाईल चोरून नेला. संतोष जालींदर मुंडे यांच्या घरीसुद्धा चोरी झाली असून त्यांच्या घरातील दोन तोळे सोने, नगदी दहा हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. चोरटे आल्यानंतर तेथील काही नागरीक जागे झाले व त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्याठिकाणावरून चोरटे पसार झाले. एकाच रात्री तीन ते चार ठिकाणी चोरीची घटना घडल्याने तेलगाव परिसरात नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement