Advertisement

 लग्न झाले अन् नवरीच फरार

प्रजापत्र | Wednesday, 03/01/2024
बातमी शेअर करा

आष्टी-  शहरातील एका फळविक्रेत्याने दोन लाख रुपये देऊन लग्न केले होते. अवघ्या पाच दिवसांत नवरीने कुटुंबीयांना खरेदी करण्यासाठी बाजारात चालले असे सांगून गुंगारा देऊन पोबारा केला आहे.याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात भांदवी ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 सविस्तर माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मण धोंडे यांच्या साडुच्या मुलास मुलगी दाखवतो म्हणून आरोपी माधव रामजी भालेराव मु.पो.मुसोड ता.कळमनुरी जि.हिंगोली याने मुलगी दाखवतो म्हणून दोन लाख रुपये घेतले दि.१६ नोव्हेंबर रोजी मुलगी दाखवली या अगोदर एक मुलगी दाखवली परंतु ती पसंत पडली नव्हती हि मुलगी मुलाला पसंत पडल्यावर पाहणी झाली त्याच ठिकाणी हार घालून विवाह करण्यात आला व लगेच आरोपीने 2 लाखाची मागणी केली.व्यापा-याने ही दोन लाख दिले दि. १८  नोव्हेंबर रोजी पुन्हा आष्टी शहरात विवाह करण्यात आला परंतु २३ नोव्हेंबर रोजी खरेदीचे कारण सांगून नवविवाहित नवरी बाजारात गेली परत आलीच नाही संपर्क साधला परंतु मोबाईल ही बंद होता.मध्यस्थी ला संपर्क केला असता आजारी आहे.आज येईल उद्या येईल सांगण्यात आले व टाळाटाळ करण्यात येताच फसवणूक झाल्याचे लक्षात आले.यावरून आष्टी पोलीस ठाण्यात भादंवी ४२०,३४  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement