औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवा निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे गुरुवारी मध्यरात्री नंतर १;३० च्या सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. न्यायपालिकेत असताना शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले निकाल ऐतिहासिक ठरले .
शेतकरी कामगार पक्षाचे नेते असलेले बी. एन. अर्थात बलभीमराव नरसिंगराव देशमुख हे व्यवसायाने वकील होते. ते राज्य विधानपरिषदेवर देखील आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यावेळी शेतकरी, कष्टकरी , कामगार यांच्यासंदर्भाने त्यांनी ऐतिहासिक निर्णय दिले. सामान्यांच्या विषयातील प्रश्नांची त्यांच्या न्यायालयाने सोमोटो दाखल घेतल्याचे अनेक प्रसंग आहेत. त्यांचे गुरुवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. शेकापचे नेते माजी खा. नरसिंहराव देशमुख यांचे ते पुत्र होते.
बातमी शेअर करा
Leave a comment