बीड-नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टेम्पोमध्ये वरून खडी आणि खालून वाळू भरत चोरटी वाहतूक करणारा एक जण एसपींच्या पथकाने रविवारी (दि.२४) पकडला आहे.गणेश मुंडे यांनी केलेल्या या कारवाईत ९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
बीड जिल्ह्यात वाळू माफिया चोरटी वाहतूक करण्यासाठी अनेक नवनवीन शकल लढविताना समोर आले आहेत.मागच्या काही काळापासून टेम्पोमध्ये वरून खडी भरायची अन त्या खालून वाळू टाकत त्याची सर्रास विक्री करायची असा धंदा सुरु होता.मात्र पोलीस अधिक्षक पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांनी यावर अधिक लक्ष केंद्रित करून माफियांचा भांडाफोड करत मागच्या चार दिवसांत नेकनूरमध्ये चोरटी वाळू वाहतूक करणारे तीन वाहने ताब्यात घेतले आहेत.त्यामुळे असे प्रकार आता उघडे पडू लागल्याने माफियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत टेम्पो चालक (एम.एच.११ बीके ३१८१) पठाण इम्रान महंमद खान यास ताब्यात घेण्यात आले आहे.सध्या पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.