Advertisement

पावणे चार कोटींच्या रस्त्याची हाताने निघते खडी

प्रजापत्र | Wednesday, 20/12/2023
बातमी शेअर करा

 कडा - अंत्यत खराब असलेल्या कडा ते शिरापूर रस्ता कामाला अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सुरुवात झाली.मात्र, ठेकेदाराकडून या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची खडी हाताने अलगद उखडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी काम बंद पाडले आहे. 

 

आष्टी तालुक्यातील कडा ते शिरापूर हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाला होता.मेहकरी, पिंपळगांव दाणी, निमगांव बोडखा, वाहीरा अशा सात गावाला जोडणारा हा रस्ता आहे. ग्रामस्थांना दळणवळण करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता. दरम्यान, आ.सुरेश धस याच्या पाठपुराव्यानंतर ३ कोटी ७३ लाखाच्या या रस्ता कामाला सुरुवात झाली.मात्र, सदरील ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.  हाताने अलगद रस्ता उखडत असल्याने ग्रामस्थांकडून हे काम बंद पाडण्यात आले आहे.उत्कृष्ट दर्जाचे काम होत असेल तरच कामाला सुरुवात करा नसता काम बंद ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
 

Advertisement

Advertisement