Advertisement

आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्याबाबत विचार 

प्रजापत्र | Tuesday, 19/12/2023
बातमी शेअर करा

नागपूर -  आई ओबीसी असेल तर तिच्या मुलांनाही कुणबी ओबीसी दाखला मिळावा ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनि  केली आहे. या मागणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली आहे या संदर्भात उपसमिती सर्व कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी मनोज जरांगे यांच्या मागणीवर निर्णय होणार नसल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.

 

 

मुलांच्या जन्माच्या दोन महिन्याच्या आत वडिलांचा मृत्यू झाला आणि आईनेच मुलांचं पालनपोषण केलं असेल तर आईची जात लावता येईल असं कोर्टाने एका निकालात म्हटलंय. तसंच दुसरीकडे राज्यातल्या एका राजकीय कुटुंबाने अशी मागणी केल्यावर मुंबई हायकोर्टाने ही मागणी फेटाळली होती. त्यामुळे याचा आधार घेत कायदेशीर बाबी तपासल्यावर यावर निर्णय घेतला जाईल. जर असा निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्वच जातींना लागू राहील असा ही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे तूर्तास जरांगेंच्या या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता धूसर दिसत आहे.

Advertisement

Advertisement