Advertisement

जुनी पेन्शन योजना मंजूर करा  

प्रजापत्र | Thursday, 14/12/2023
बातमी शेअर करा

 बीड - शासनाने काही वर्षापूर्वी जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. याबाबत कर्मचार्‍यांत संताप व्यक्त केला जात आहे. कर्मचार्‍यांनी वेळोवेळी जुन्या पेन्शन योजनेबाबत आवाज उठवला. मात्र याची दखल शासनाने अद्याप पर्यंत घेतलेली नाही. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने कर्मचार्‍यांनी आंदोलनाची हाक दिली. काम बंद करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यात विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग आहे. 

 

दरम्यान नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देवून त्यांच्या सेवा नियमीत कराव्यात, नविन शिक्षण धोरण रद्द करावे यासह आदि मागण्या कर्मचारी संघटनांच्या आहेत. या आंदोलनात राज्य सरकारी, निकसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग आहे.

Advertisement

Advertisement