Advertisement

मराठवाडा रेल्वे बोगी फॅक्टरीत पहिला कोच तयार, रेल्वेमंत्र्यांकडून कौतूक

प्रजापत्र | Sunday, 27/12/2020
बातमी शेअर करा

लातूर : देशातील चौथ्या व महाराष्ट्रातील पहिल्या येथील रेल्वे बोगी (कोच) कारखान्यातून शुक्रवारी (ता. २6) पहिल्या कोच शेलची निर्मिती पूर्ण झाली. हा कोच शेल तयार करून सुशासन दिनी रेल्वेने पहिले पाऊल टाकत प्रत्यक्ष निर्मितीला सुरवात केली आहे.

लातूर : देशातील चौथ्या व महाराष्ट्रातील पहिल्या येथील रेल्वे बोगी (कोच) कारखान्यातून शुक्रवारी (ता. २५) पहिल्या कोच शेलची निर्मिती पूर्ण झाली. हा कोच शेल तयार करून सुशासन दिनी रेल्वेने पहिले पाऊल टाकत प्रत्यक्ष निर्मितीला सुरवात केली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून याची माहिती देत महाराष्ट्रातील या अत्याधुनिक कारखान्यातून मोठ्या संख्येने रोजगार मिळेल व लातूर भागात एक औद्योगिक परिसंस्था निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यानिमित्त रेल्वेने ‘मेक इन इंडिया’ला वेगळी उंची मिळवून दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.अडीच वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने अतिरिक्त एमआयडीसी परिसरात प्रकल्पाच्या उभारणीला सुरवात झाली. रेल्वेमंत्री गोयल व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर प्रकल्पाच्या उभारणीला वेग आला. प्रकल्पाचे नामकरण मराठवाडा रेल्वेकोच फॅक्टरी होऊन टप्प्याटप्प्याने कारखान्यात रेल्वेकोच निर्मितीच्या सुविधा तयार झाल्या.

डिसेंबरमध्ये कारखान्यात प्रकल्प कोच निर्मितीला सुरवात होणार असल्याने अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी अर्थात सुशासन दिनी या प्रकल्पाचा आभासी (ऑनलाइन) लोकार्पण सोहळा घेण्याची मागणी आमदार पवार यांनी गोयल यांच्याकडे केली होती. त्यास गोयल यांनी तत्त्वतः मान्यता  दिली. 

Advertisement

Advertisement