गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील विशाखा पट्टनम महामार्गावरील भेंडखुर्द फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओ क्र.एम.एच.१४ एफ.सी.१४०८ ही ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात मुकादम लिंबाजी उत्तम चौरे (वय ३० रा. मेडसगाव ता. पाथरी), दत्ता दादाराव कांबळे (वय - ३३ ) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश गोपाल चौरे, कैलास सखाराम चौरे, विलास कांबळे, आसाराम नेहरकर, कैलास शिंदे हे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती कळताच गोपनीय शाखेचे विठ्ठल चव्हाण, पोलिस नाईक सोनवणे घटनास्थळी दाखल झाले होते. तलवाडा ठाण्याचे स.पो.नि. शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ डोंगरे पुढील तपास करत आहेत. सदर स्कॉर्पिओ ही पुण्याहून येत होती. काही ऊसतोड मजुर पैसे घेवून पुण्याला गेल्याने ते त्यांना शोधण्यासाठी गेले होते अशी माहिती समोर येत आहे.
![](https://prajapatra.com/sites/default/files/styles/large/public/8fa8dbcd-3ebc-47d4-8c62-89be3f375cf5.jpg?itok=Zu8gZXqF)
बातमी शेअर करा