Advertisement

 रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही

प्रजापत्र | Monday, 11/12/2023
बातमी शेअर करा

नाशिक -  केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार  मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत आहे. याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. तसेच, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले. 

 

 

यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, तुम्ही सगळे कष्ट करतायत, पण  सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. ज्यांच्या हातात धोरणं ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांना जाणं नसेल तर शेतकरी उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मी मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की, कांदा संदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तत्काळ दिल्लीला गेलो. त्यावेळी, भाजपचे लोकं कांद्याच्या माळ गळ्यात घालून आले होते. याबाबत अध्यक्षांना विचारल्यावर कांद्याचे भाव खूप वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असे मला अध्यक्षांनी विचारले. त्यावर, दोन पैसे शेतकर्याना मिळत असतील तर मिळू द्या असे मी त्यांना सांगितले, असल्याच पवार म्हणाले. 

Advertisement

Advertisement