Advertisement

कांदा निर्यातीबद्दल दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय 

प्रजापत्र | Sunday, 10/12/2023
बातमी शेअर करा

 केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा  निर्णय घेतल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारची देखील डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र आहे. अशात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. कांदा निर्यातीबद्दल दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे मुंडे म्हणाले आहेत. 

 

 

केंद्राने कांद्याची निर्यात रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, कांद्याचे दर घसरले आहेत. दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, "या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत असून, दोन दिवसांमध्ये यावर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला जाईल असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. त्यामुळे आता केंद्राच्या निर्णयाकडे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा लक्ष लागले आहे. 

Advertisement

Advertisement