Advertisement

बीडमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांचे थाळीनाद आंदोलन 

प्रजापत्र | Thursday, 07/12/2023
बातमी शेअर करा

बीड - गेल्या चार डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. सरकार आपल्या मागण्यांची दखल घेत नसल्याने आज सर्व अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन केले.

 

 

   चार डिेसेंबरपासून या अंगणवाडी सेविका, मदतनीस बेमुदत उपोषणावर आहेत. तरी सरकारने अद्याप त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्या अनुषंगाने अंगणवाडी मदतनिसांमधून सेविकेची निवड करावी, या सेविकांमधून मुख्य सेविकेची निवड करावी, अंगणवाडी सेविकांना २६ हजार तर मदतनिसांना २२ हजार इतके मानधन १ डिसेंबर २०२३ पासून देण्यात यावे

 

पुरक पोषण आहाराचा दर प्रतिदिन चार रुपये ठरविण्यात यावा, अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांचे पगार पीएफएमएस या प्रणालीद्वारे करण्यात यावे, दहावी मदतनिस असतील त्यांना थेट सेविका म्हणून नियुक्ती देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनिस आणि सेविका उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement