शिंदे सरकारचं यंदाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे.संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास शंभर मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती आहे. ४५ पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे.
नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हिलंस व्हॅन तैनात असणार आहे. अधिवेशन काळात पोलीसांचं जेवण, निवास आणि आरोग्याची उत्तम व्यवस्था असेल, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.