Advertisement

मराठवाड्यात लसीचे सव्वाकोटी डोस साठविण्याची क्षमता

प्रजापत्र | Friday, 25/12/2020
बातमी शेअर करा

बीड   : देशपातळीवर कोरोना लसीकरणाची तयारी युध्द पातळीवर सुरु आहे. कोरोनाची लस दोन स्वरुपात उपलब्ध होऊ शकते. त्या दृष्टीने साठवणूकीची तयारी आरोग्य विभागाने सुरु केली आहे. उने 15 ते उने 25 डिग्री सेल्सीयस या तापमानात साठवून ठेवण्याची गरज निर्माण झाली तर असे सव्वा कोटी डोस साठविण्याची क्षमता मराठवाड्यात असल्याची माहिती आहे. 
आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणासंदर्भाने वाहतूक, साठवणूक आणि शितसाखळीच्या तयारीची चाचपणी केली असून त्यानूसार मराठवाड्यात शितसाखळीचे 560 ठिकाणे निश्‍चित करण्यात आले आहेत. तर रेफ्रीजरेटरची संख्या 629 इतकी आहे. त्यासोबतच उने तापमानात ठेवावी लागणारी लस आली तर ती ठेवण्यासाठी तब्बल 691 डिपफ्रिजर मराठवाड्यात उलपब्ध आहेत. या मार्गाने सुमारे सव्वा कोटी डोस साठवून ठेवता येतील अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे मराठवाड्यात तरी लस उपलब्ध झाल्यानंतर साठवणूकीची अडचण येणार नसल्याचे चित्र आहे.

 

 

Advertisement

Advertisement