Advertisement

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत, जुनमध्येही राहणार निर्बंध

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

मुंबई : मे नंतर लॉकडाऊन उठणार की नाही, हा प्रश्न आहे. पण लॉकडाऊन अचानक उठवता येत नसते. आणखी केसेस वाढतील असा अंदाज आहे. लॉकडाऊन नव्हे तर आयुष्याची नाडी हळूहळू सुरु करावी लागेल असे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे जून महिन्यातही महाराष्ट्र निर्बंधातच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 
उद्धव ठाकरे राज्याला संबोधून बोलताना म्हणाले , राज्यात मे अखेर सव्वा  लाख रुग्ण असतील असे सांगितले जात होते , आजच्या तारखेत ४७ हजार रुग्ण  झालेत,तर सक्रीय  रुग्ण  ३३ हजार आहेत. साडेतीन लाख टेस्ट आपण घेतल्यात . १५७७ मृत्यू  झालेले आहेत. कोरोनाग्रस्त महिलांच्या प्रसूती देखील आपण केल्या. त्यांची बालकं कोरोनामुक्त  आहेत. आपण कोरोनाचा मुकाबला यशस्वीपणे करतोय. पुढची लढाई अधिक बिकट होणार आहे, केसेस वाढतील, पण  घाबरू नका. आपण मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा निर्माण करतोय. मोठ्याप्रमाणावर बेड तयार करतोय असे ठाकरे म्हणाले. 
रुग्णांची गैरसोय व्हायला नको, पण संकटच एव्हढं मोठं आहे, तरीही आपण प्रयत्न करतोय. ३ टप्प्यात आपण आरोग्य व्यवस्था सुरु केली आहे. आता पुन्हा एकदा रक्तदानाची गरज आहे. राज्यात ८-१० दिवसांचीच रक्त. महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे, रक्तदात्यांनी पुढे यावे . महाराष्ट्राचे रक्त काय आहे हे दाखवून द्यावे. पावसाळ्यात साठी उदभवणार नाहीत , आपण आजारांपासून लांब राहू याची काळजी घ्या. काही लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा. वेळेत उपचार सुरु झाले तर रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. नवनवी औषधं वापरत आहेत . म्हणून लक्षण अंगावर काढू नका असे आवाहन ठाकरे यांनी केले. 
पॅकेजबद्दल बोलताना ठाकरे यांनी अगोदर आरोग्याचे संकट दूर होऊद्या, नंतर पॅकेजही देऊ. पोकळ घोषणा करणार नाही. आज आपण धान्य, जेवण देत आहोत , आरोग्य सेवा देत आहोत. महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती आपण सरसकट वाढविली आहे, पण या जाहिरात करण्याच्या गोष्टी नाहीत. परराज्यातील मजुरांवर खर्च केले, त्यांच्या वाहतुकीची सोय केली, हे पॅकेज नसते का ? एसटीच्या माध्यमातून ३ लाख ८० हजार मजुरांना स्टेशन पर्यंत किंवा त्यांच्या राज्यात पाठवले आहे , यापेक्षा वेगळे पॅकेज कोणते पाहिजे असे ठाकरे म्हणाले. 
शेती आणि शिक्षणाचा काळ सुरु होतोय. त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सरकार त्यासाठी निश्चित सकारात्मक निर्णय घेईल. अर्थचक्र सुरु करतोय , ५० जर उद्योग सुरु केलेत, एसटी सुरु करतोय, नरेगावर लाखो लोक काम करत आहेत हे देखील  महत्वाचे असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अनेक सेवांना परवानगी देतोय, अंतर्गत स्थलांतर सुरु केलय, ग्रीन झोनमध्ये काही ठिकाणी चित्रीकरणाला परवानगी देण्याचा विचार करतोय , आणि आणखी काय सुरु करता येईल यावर सरकार गांभीर्याने आणि सकारात्मक निर्णय घेणार आहे. शेती चालू राहिलीच पाहिजे हा प्रयत्न आहे. अनेक नवीन प्रयोगशाळा सुरु करतोय . पण यासर्वांसाठी आपण सुरक्षित राहिलं पाहिजे असे ठाकरे यांनी सांगितले. 
जा संकटाचा काळ आहे, कोणीही यात राजकारण करू नये. कोणी केलं तरी आम्ही करणार नाही. कारण महाराष्ट्राची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही, आमचं सरकार प्रामाणिकपणे काम करतोय, पण यात कोणी राजकारण करू करू नका. आम्हाला केंद्राकडून अजूनही अनेक गोष्टी मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही बोलत नाही. मात्र अशा परिस्थिती राजकारण ही काही माणुसकी नाही , ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्राचा संस्कार नाही. 
मे नंतर लॉकडाऊन उठणार की नाही, हा प्रश्न आहे. पण लॉकडाऊन अचानक उठवता येत नसते. आणखी केसेस वाढतील असा अंदाज आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता तो किती दिवस असेल हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement