Advertisement

 बेपत्ता विवाहितेचा तीन दिवसांनी आढळला मृतदेह   

प्रजापत्र | Thursday, 30/11/2023
बातमी शेअर करा

कडा- मानसिक त्रासाला कंटाळून घरातून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा तीन दिवसांनी विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरवाडीच्या तिघांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. तर सासू फरार झाली आहे. कोमल श्रीकांत राऊत वय वर्ष २५ असे मयत विवाहितेचे नाव आहे.

 

 

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील माहेर असलेल्या कोमल हिचा धामणगांव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.काही वर्ष सुखाचा संसार चालला असताना कोमलला पती,सासरा,साहू,दीर मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने २६ नोव्हेंबर रोजी कोमल बेपत्ता झाली. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी घरालगतच्या राऊत कुटुंबाच्या मालकीच्या विहिरीत कोमलचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. 

Advertisement

Advertisement