Advertisement

अवकाळी पावसाचा तडाखा;शेतकरी अडचणीत 

प्रजापत्र | Monday, 27/11/2023
बातमी शेअर करा

बीड - दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने ज्वारी, कापसासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागात रविवारी दुपारपासून पावसाळा सुरवात झाली. यात बीड व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

 

मध्यरात्री बीडसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये जगवलेली ज्वारी भुईसपाट झाली आहे. तर कापसासह अन्य पिकांचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळापाठोपाठ आता अवकाळीचे देखील संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

Advertisement

Advertisement