कडा- शुक्रवारी रात्री पुण्याहून नांदेडला निघालेल्या माऊली ट्रॅव्हल्सच्या बसला बीडवरून अहमदनगरकडे जाणार्या एका ट्रकने हुल दिली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून खड्ड्यात कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून बसमधील ४० प्रवाशांचा जीव वाचला. हा अपघात बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे आज पहाटे एकच्या दरम्यान घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, माऊली ट्रॅव्हल्सची एक बस ( एम.एच क्रमांक २२.३८६७ ) पुण्याहून ४० प्रवाशांना घेऊन घेऊन बीडमार्ग नांदेडला जात होती. तर बीडहून अहमदनगरकडे एक ट्रक सुसाट वेगात जात होता. पहाटे १ च्या सुमारास बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे ट्रकने हुल दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रोडलगत असलेल्या खड्ड्यात गेली.
बातमी शेअर करा