विशाखापट्टणम येथून मोठी बातमी समोर आलीये. शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत ४० बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक मच्छिमारांनी या बोटीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रविवारी रात्री मच्छीमारी करून अनेक बोटी किनाऱ्यावर परतल्या होत्या. यावेळी अचानक एका बोटीत स्फोट झाल्याचा आवाज आला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मच्छीमारांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. या स्फोटात बोटीला आग लागली. पुढे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. आगीत तब्बल ४० बोटी जळून खाक झाल्यात.