नाशिक : महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण दलातील तब्बल ११८ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण दलात ११७ जण कोरोना पॉजिटीव्ह आढळल्याने नाशिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला धक्का बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला होता. जिल्हा कोरोनाच्या विळख्यातून सुटतोय असे वाटत असतानाच जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण दलात आढळलेल्या पॉजिटीव्ह रुग्णांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
बातमी शेअर करा