मुंबई-एकीकडे कोरोनाशी लढण्यासाठी राज्याची तिजोरी खर्ची पडत असतानाच राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सरसकट सर्व नागरिकांना देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. अर्थात ही सवलत 31 जुलै पर्यंतच लागू राहणार आहे.
राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. मात्र यातून अनेकजण आतापर्यंत वगळले गेले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व नागरिकांना मग त्यांच्याकडे कुठलेही रेशनकार्ड असले तरी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एक हजाराहून अधिक रुग्णालयांमध्ये ही योजना सध्या राबविण्यात येते. यात रुग्णाचा वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकार मार्फत भरला जातो. या निर्णयानंतर राज्यातील सरसकट सर्वांना अशी योजना लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे अनेक योजना गुंडाळल्या जात असताना महाराष्ट्राने मात्र सामान्यांच्या हीतासाठी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Leave a comment