Advertisement

प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रजापत्र | Thursday, 24/12/2020
बातमी शेअर करा

दिल्ली :  दिल्ली येथे सुरु  असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना समर्थनार्थ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रियांका गांधी मोर्चा काढणार होत्या मात्र त्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कृषी कायद्यांविरोधी सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 29 वा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विजय चौक ते राष्ट्रपती भवन दरम्यान मोर्चा काढायचा होता, मात्र पोलिसांनी यास परवानगी नाकारली. मात्र त्यानंतरही मोर्चा काढल्यानंतर प्रियंका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रियांका म्हणाल्या- शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणे पाप आहे
प्रियांका म्हणाल्या की, भाजप नेते व समर्थक हे शब्द शेतकऱ्यांसाठी वापरत आहेत, ते पाप आहे. जर सरकारने शेतकर्‍यांना देशविरोधी म्हटले तर सरकार पापी आहे. या सरकारविरोधातील कोणताही असंतोष दहशतीच्या दृष्टिकोनातून पाहिला जात आहे. आम्ही हा मोर्चा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवण्यासाठी काढत होतो. जेव्हा सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकेल व त्यांचा आदर करेल तेव्हाच त्यांचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी सांगितले.

 

Advertisement

Advertisement