Advertisement

बालविवाह ! ११ वर्षाची नवरी अन् १३ वर्षाचा नवरदेव

प्रजापत्र | Saturday, 04/11/2023
बातमी शेअर करा

 कडा- बालविवाह रोखले जावेत यासाठी सरकारने कडक कायदे केले असताना  कायद्याला झुगारून बालविवाह होताना दिसत आहेत. ११ वर्षाची नवरी अन् १३ वर्षाच्या नवरदेवाचा असाच एक बालविवाह हळदी समारंभात झाल्याचे आष्टी तालुक्यात समोर आले आहे. या प्रकरणी चार जणांवर २ नोव्हेंबर रोजी ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

आष्टी शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात मागील १९ आक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आईने ११ वर्षाच्या मुलीचा विवाह करमाळा ( जि. सोलापूर) तालुक्यातील देवळाली येथील १३ वर्षीय मुलासोबत हळदी समारंभात लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार २१ आक्टोबर रोजी समोर आला आहे. खुद्द आईनेचे हा  विवाह लावून दिल्यानंतर बापाने या प्रकाराला वाचा फोडली. पोलिस अधीक्षक, आष्टी पोलिस ठाण्यात अल्पवयीन विवाह झाल्याची तक्रार दाखल केली.त्यानंतर ग्रामसेवक बापू कुंडलिक नेटके याच्या फिर्यादीवरून २ नोव्हेंबर रोजी सुशिला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे, राधा गौतम काळे याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कलमानुसार  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Advertisement

Advertisement