बीड- आ. प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मराठा आंदोलका आक्रमक झाले. सोळंकेंच्या घरावरील दगडफेक प्रकरणी पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले असून आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संवाद साधणाऱ्या सुंदर भोसले (रा. धुनकवड, ता.धारूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे
आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरून राडा झाला. प्रकाश सोळंके यांच्यांशी साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर मोठा जमाव दगडफेक करत जाळपोळ करत होता. सुंदर भोसले हा धारूर तालुक्यातील धूनकवड येथील रहिवासी आहे. रात्री उशिरा सुंदर भोसले याला माजलगाव पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे.