बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं देखील सुरु करण्यात आली आहेत. त्यातच आरक्षणासाठी आमदार खासदारांच्या राजीनाम्याचं सत्र सध्या सुरु असल्याचं पाहायला मिळतयं. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आलीये. बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिलाय.
याआधी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच मनोज जरांगे यांनी आमदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच आता भाजप आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झालं तर सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण केली जातेय.