माजलगाव मदतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक अन् जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच आयपीएस पंकज कुमावत यांनी घटनास्थळी आपल्या बॉडीगार्डसह धाव घेतली. मात्र त्यांना तेथील जमावाने अडवत त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये त्यांचा बॉडीगार्ड आणि चालक जखमी झाले आहेत. बॉर्डीगार्डला सहा टाके पडले असल्याची माहिती मिळाली आहे .
बातमी शेअर करा