Advertisement

चंद्रकला ढाकणे यांची प्राणज्योत मालवली

प्रजापत्र | Saturday, 28/10/2023
बातमी शेअर करा

हातगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेल्या चंद्रकला कारभारी ढाकणे यांचे नुकतेच वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.मनमिळावू आणि लाघवी स्वभावाच्या चंद्रकला ढाकणे यांची प्राणज्योत मालवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे.

   त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. बालमटाकळी येथील भगवान विद्यालयाचे माजी प्राचार्य स्व. कारभारी ढाकणे यांच्या त्या पत्नी होत्या. तर भारतीय जनता पक्षाचे अपंग सेलचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्रशांत ढाकणे व पिंप्रीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण ढाकणे यांच्या त्या मातोश्री होत्या. तसेच राष्ट्रीय वंजारी, ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दादासाहेब ढाकणे यांच्या त्या चुलती होत्या. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण ढाकणे परिवार हातगाव शोकसागरात बुडाला आहे.

Advertisement

Advertisement