बीड - जुलै ते सप्टेंबरपर्यंत १० ते २० रुपये किलो दराने विकला गेलेल्या कांद्याला दसरा होताच सोनेरी दिवस आले आहेत, बीड येथील ठोक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ५० रुपये किलो दराने विकला, तर साधारण कांद्याला ४०ते ४५ रुपये भाव मिळाला. आवक कमी होत असल्याने दिवाळीला कांद्याचे दर आणखी वाढतील . त्यामुळे दर्जेदार कांदा असणाऱ्या शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळणार आहे. बीड येथील आडत बाजारात नेकनूर, चौसाळा, ईट, पिंपळनेर या भागातून कांद्याची आवक होत आहे. याशिवाय अहमदनगर, राहुरी, घोडेगाव भागातून जास्त प्रमाणात आवक होत आहे.तीन महिने घसरले होते भाव साधारण ८ ते १० रुपये किलो दराने ठोक बाजारात कांदा विकला गेला होता . मात्र किरकोळ बाजारात १२ ते १५ रुपये किलो होता कांदा . मात्र आता सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव चांगलेच वाढले आहेत .
मागील काही दिवसात दर दोन चार दिवसाला कांदा ८ ते १० रुपये किलोने महागला .मात्र आवक कमी असल्याने हि परस्थिती असून आठवडी बाजारात चांगला कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे .अशीच परिस्थिती राहिली तर दिवाळीनंतर कांद्याचे भाव गगनाला भिडू शकतात .
सचिन दुधाळ
भाजी विक्रते