मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यात भाषण करत असताना मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसंच ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. यापुढे मराठा समाजाचं आंदोलन झालं तर ते शांततेत होईल पण ते सरकारला पेलवणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले होते. आता आज ते काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आंदोलनावर आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.a
बातमी शेअर करा