परळी वैजनाथ - भोजनकवाडी येथे शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला पहाटे ४ च्या सुमारस अज्ञातानी आग लावल्याने सोयाबीनची गंजी जळुन खाक झाली. या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करावी व पंचनामा करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी भक्तराम फड यांनी केली.
तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतकरी मनोहर कुंडलिक फड व अन्य एका शेतकऱ्याचे शेतात सोयाबीन पेरले होते. नुकतेच सोयाबीन सोंगून शेतात गंजी लावून ठेवले होते. मात्र, देवंगरी येथील शेतातील सोयाबीन गंजीला रात्री आग लावण्यात आलीय. शेतात तीन एकरमधील सोयाबीन काढून गंजी लावून ठेवली होती. पहाटेच्या ४ वाजण्याच्या दरम्यान या गंजीस अज्ञातानी आग लावल्याने गंजी जळून खाक झाली. शेतकऱ्याने तीन एकर मधील सोयाबीन काढून शेतात गंजी लावली होती या गांजीस अज्ञातानी आग लावल्याने संपूर्ण गंजी आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
भोजनकवाडी शिवारातील शेतकरी मनोहर कुंडलिक फड यांचा सोयाबीनचा गंजी अज्ञातांनी पेटवून दिली. शेतकरी अंगोदरच चिंतेत असुन कर्जबाजारी पण आहेत. तरी चौकशी करून गंजीस आग लावणाऱ्यास तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. तसेच पोलिसात तक्रार दिली आहे. तलाठी भताने यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. मेहनतीनं पीक आणलं होतं. तालुक्यात दुष्काळ परिस्थिती कमी पाऊसपाणी शेतकरी वाईट परिस्थितीत असून त्यांना आधाराची गरज आहे. अशा वेळी सोयाबीन पेटवल्यामुळे शेतकरी भयभीत आहे. या घटनेची चौकशी करून लवकरात लवकर आरोपीवंर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी केली आहे.