मुंबई - शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी उबाठा आणि शिंदे या दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जी कागदपत्रे सादर केली आहेत, तीच कागदपत्रे आमच्यासमोर सादर करावीत असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.
26 ऑक्टोबरला पुढील सुनावणी
सुनावणीदरम्यान, २५ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटांच्या आमदारांना वेळ देण्यात आला. तसेच पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलं. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्रं ग्राह धरण्यात यावी अशी मागणी केली, ती मागणी अध्यक्षांनी मान्य केली. यावेळी दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जी कागदपत्रे सादर केली ती माझ्यासमोर सादर करा असे निर्देशही दिले.
बातमी शेअर करा