बीड-जिल्ह्यासह विविध भागातून चोरीला गेलेल्या सात दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करत एक आरोपी आज (दि.२०) ताब्यात घेतला आहे. ही कारवाई अंमळनेरमध्ये पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यासह राज्यभरात दुचाकी चोरीचा घटनेत प्रचंड वाढ झालेली आहे. दुचाकी चोरांच्या टोळीमुळे वाहनधारक बेजार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यात चोरीला गेलेल्या वाहनासह चोरट्याना जेरबंद करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी तपासाची चक्रे गतिमान करत आज(दि.20) मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भात
गुप्त बातमीदारामार्फत संतोष ऊर्फ सोनू कैलास गोलवड,अक्षय रामदास बर्डे (दोन्ही रा.अंमळनेर ता.पाटोदा) यांनी चोरी केलेल्या दुचाकी विक्रीसाठी अंमळनेर येथील राहत्या घराच्या समोरील पत्र्याचे शेडमध्ये ठेवल्या आहेत, अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री.सुतळे यांचे टीमने मौजे अंमळनेर ता.पाटोदा जि.बीड येथे जाऊन इसम नामे संतोष ऊर्फ सोनू कैलास गोलवड रा.अंमळनेर ता.पाटोदा जि.बीड यास दुपारी 3 वाजता ताब्यात घेऊन विचारपूस केली असता
सदरच्या मोटार सायकल त्यांनी त्याचे मौजे अंमळनेर ता.पाटोदा जि.बीड येथील राहत असलेल्या घरा समोरील पत्र्याचे शेडमध्ये ठेवल्या आहेत अशी माहिती दिली.दरम्यान या सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून एकाला ताब्यात घेतले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड, पोलीस उप निरीक्षक श्री. सुशांत सुतळे, पोह रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळासाहेब जायभाये, पोना राजु पठाण, पो.अं.आलीम शेख, अश्विनकुमार सुरवसे, चालक पोह अुतल हराळे यांनी केलेली आहे.
या मिळालेल्या दुचाकी..
1 होन्डा सी.बी.शाईन सिलव्हर रंगाची ME4JC856KLD049455 JC85EDO197348
2. हिरो होंडा स्पेंडर काळया व निळया रंगाची MBLHAR074JHD39528 HA10AGJHD50828
3 होन्डा सी.बी.शाईन काळया रंगाची ZME4JC652DGT108539 JC65ET0332327
4. रॉयल इलेफंट बुलेट जांभळया रंगाची ME3U3S5F2LC900165 U3S5F1LC515934
5. हिरो स्पेंडर काळया निळया रंगाची 07L03F12368 07LI8E46235
6. हिरो स्प्लेंडर काळया निळया रंगाची MBLHA10BFFHC08761 HA10ERFHC02645
7. हिरो स्प्लेंडर प्लस काळया निळया रंगाची MBLHA10AMD9C04399 HA10EJD9C06564
या ठाण्यात आहेत गुन्हे दाखल
पोलीस ठाणे पाटोदा गुरनं 235/2023 कलम 379 भादवि
पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर 413/2022 कलम 379 भादवि
पोलीस ठाणे संभाजीनगर परळी वै.गु.र.नं.90/2021 कलम 379 भादवि
पोलीस ठाणे जामखेड जि.अ.नगर गु.र.नं.227/2023 कलम 379 भादवि
पोलीस ठाणे दिघी पिंपरी चिंचवड गुरनं 12/2018 कलम 379 भादवि
पोलीस ठाणे टेंबुर्णी जि.सोलापुर गुरनं 307/2026 कलम 379 भादवि गुन्हा दाखल आहेत.
आरोपीवर यापूर्वीही दुचाकी चोरीचा गुन्हा
आरोपी नामे संतोष ऊर्फ सोनू कैलास गोलवड (वय 24 वर्ष रा.जातेगाव खडकी ता.करमाळा जि.सोलापुर ह.मु.अंमळनेर ता.पाटोदा जि.बीड) यास दोन मोटार सायकलचे मुद्येमालासह पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान आरोपी संतोष ऊर्फ सोनू कैलास गोलवड याचेवर यापूर्वी पोलीस स्टेशन शिरुर (का) येथे मोटारासायलक चोरीचा गुन्हा क्र.120/2022 कलम 379,420,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.