Advertisement

गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

प्रजापत्र | Friday, 20/10/2023
बातमी शेअर करा

 

आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज हरपला. आंबेडकरी चळवळीत सक्रीय असणाऱ्या महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका वैशाली शिंदे यांचे गुरुवारी केईम हॉस्पीटल मुंबई येथे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आलीय. वैशाली शिंदे या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. 

 

वैशाली या गेले अनेक महिने मधुमेहाने ग्रस्त होत्या. त्यातच त्यांच्या पायाला गॅंगरीन झाले होते. केईएम हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

 

 

 

वैशाली शिंदे यांना आई-वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला. त्यांचे आई - वडिल भीमगीतं गात असत. त्यामुळे लहानपणापासूनच भीमगीतांचं महत्व आणि शिकवण वैशाली यांना मिळाली. पुढे त्या आई - वडिलांसोबत पुण्यात स्थायिक झाल्या. विष्णू शिंदे यांच्याशी विवाह करुन त्या पुढे मुंबईत आल्या.

 

आई - वडिलांकडून मिळालेली शिकवण घेऊन भीमगीतं गाऊन वैशाली शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीला आवाज दिलाय. त्यांच्या बुलंद आवाजातुन त्यांनी आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देत आपल्या गायनातून समाज प्रबोधन केले.
 

Advertisement

Advertisement