मुंबई : ब्रिटन मध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन बदल हा संपूर्ण जगासमोर एक प्रश्नचिन्ह आहे. कोरोनात अचानक झालेल्या या घातक बदलाच्या धर्तीवर अनेक देशामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु ब्रिटेनमध्ये आढळलेला नवीन कोरोना व्हायरस भारतातील चाचण्यांमध्ये आढळला नाही. असे नॅशनल रिसर्च इंस्टीट्यूट ने सांगितले
NARI चे डायरेक्टर डॉ. समिरन पांडा यांनी मंगळवारी सांगितले की, आम्ही देशातील विविध ठिकाणांवरुन गोळा केलेल्या सँपलचे परीक्षण केले आहे. यात कोरोनाचा ब्रिटेनमधील नवीन स्ट्रेन आढळला नाही. त्यांनी पुढे सांगितले की, या नवीन व्हायरसचे संक्रमण आणि गंभीरता समजण्याची आवश्यकता आहे. अजून या व्हायरसचा मानवी शरीरावरील परिणामही कळू शकला नाही.
भारतातील व्हायरसमध्येही बदल नाही
डॉ. पांडा पुढे म्हणाले की, आम्ही देशात पसरत असलेल्या व्हायरल जीनोमवर 6-7 महिन्यांपासून लक्ष्य ठेवत आहोत. यासाठी 2000 पेक्षा जास्त सँपलचे परीक्षण केले, पण यात कोणतेही बदल आढळले नाही. भारतात व्हायरसचा संसर्ग एकसारखा नाही. प्रत्येक राज्यात हा व्हायरस वेगवेगळ्या प्रकारे फिरत आहे.