धारूर - तालुक्यातील पिंपळवाडा शिवारात गुरुवार (दि.१२) रोजी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व पोलीस ठाणे धारूर यांची संयुक्त कारवाई करत अवैध गांजाची २८ किलो वजनाचा १ लाख ४४ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी लक्ष्मण तिडके यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि, पिंपळवाडा येथे गांजाची शेती करत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्याच्या मार्फत मिळाली की पिंपळवाडा शिवारात लक्ष्मण जयवंत तिडके रा.भोगलवाडी हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या गांजाची झाडे लावून त्याचे संवर्धन करून जोपासना करीत आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी बाळासाहेब डापकर,दिलीप गित्ते, अनिल मंदे, गोविंद मुंडे, तसेच धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय आटोळे,पोलीस कर्मचारी जमीर शेख, वसंत भताने, कदम, धम्मा गायसमुद्रे, यांनी संयुक्तपणे कारवाई करत २८ किलो वजनाचा १ लाख ४४ हजार ५२० रुपये किमतीचा गांजा या कारवाई मध्ये जप्त केला असून आरोपी लक्ष्मण जयवंत तिडके याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय आटोळे करत आहेत.