बीड दि. १२ (प्रतिनिधी ) : दिवाणी न्यायालयाची स्थगिती असतानाही लेआऊट मंजूर केल्याप्रकरणी बीड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी राज्य सरकारने दिले होते. आता या प्रकरणात गृहने दाखल करण्यास मुंबई मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
बीड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी दिवाणी न्यायालयाची स्थगिती असतानाही सीमांकन मंजूर करून न्यायालयाचा अवमान केला आणि शासनाचा विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने गुट्टे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशाला आव्हान देणारी याचिका उत्कर्ष गुट्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या प्रकरणात नियमानुसारच काम झाल्याचा दावा गुट्टे यांनी केला . याची सुनावणी न्या. आर. जी. अवचट आणि न्या. संजय देशमुख यांच्या पिठासमोर झाली. यात न्यायालयाने आणखी प्रतिवादींना नोटीस देण्याचे निर्देश देत याची सुनावणी ३० नोव्हेम्बरला ठेवली आहे. तो पर्यंत गुट्टे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
प्रजापत्र | Thursday, 12/10/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा