Advertisement

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रजापत्र | Tuesday, 10/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. 

 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती.

Advertisement

Advertisement