बीड : शेतकरी हिताच्या गप्पा मारणार्या आ.प्रकाश सोळंकेंच्या लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने शेतकर्यांना ऊसाचा पहिला हप्ता 1600 रुपयांचा दिला आहे. माजलगाव मतदारसंघातील इतर कारखाने 1900 ते 2000 रुपयांचा पहिला हप्ता देत आहेत. या सर्वच कारखान्यांनी अडीच हजार रुपयांचा पहिला हप्ता काढावा आणि अंतिम दर जाहीर करावा या मागणीसाठी सोमवारी मी शेतकरी माझा हक्क संघटनेच्या बॅनर खाली शेतकर्यांनी लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्यावर आंदोलन केले. या वेळी कारखान्याने मोठा पोलीस बंदोबस्त मागविला होता.
आ.प्रकाश सोळंकेंच्या लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने ऊसाचा पहिला हप्ता 1600 रुपयांनी काढल्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा कारखाना ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आले की दरवेळी शेतकर्यांची अडवणूक करतो अशी ओरड आता शेतकरी करत आहेत. कारखान्याने अडीच हजार रुपयांनी पहिला हप्ता काढावा आणि ऊसाचा अंतिम दर जाहीर करावा अशी मागणी करत परिसरातील शेतकर्यांनी सोमवारी कारखान्यावर मोर्चा काढला. त्यानंतर हे शेतकरी कारखाना परिसरात गेले त्यावेळी शेतकर्यांना पोलीसांनी कारखान्याच्या गेटवरच अडविले. हे आंदोलन दडपण्यसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकीकडे दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देत असताना राष्ट्रवादीचेच आमदार मात्र शेतकर्यांच्या मोर्चापुढे पोलीस उभे करीत असल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करा