बीड-जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि माफियांच्या मुजोरपणाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चांगलाच ब्रेक लावण्याचे काम हाती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एसपी यांच्या पथकाचे प्रमुख, सपोनि गणेश मुंडे यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतूक करणारा हायावा काल मध्यरात्री २.३० च्या सुमारास ताब्यात घेतला.गेवराईमध्ये ही कारवाई करण्यात आली होती.
जिल्ह्यात वाळूचा अवैध व्यवसाय मोठया प्रमाणावर सुरु आहे. या व्यवसायातून माफियांची एक मोठी लॉबी सक्रिय असून अलीकडच्या काळात माफियांच्या मुजोरपणाने कळस गाठला होता.त्यामुळे या धंद्याला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी कठोर करावायाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक प्रमुख गणेश मुंडे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी वाळू साठ्यावर धाड मारून कोट्यावधिंचा माल ताब्यात घेतला.रविवारी ही मध्यरात्री २.३० च्या सुमारास गेवराईत वाळू वाहतूक करणारा एक हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.