परळी - येथील रेल्वे स्टेशन मध्ये प्लॅटफार्म क्रमांक तीनवर नांदेड - बंगळरू रेल्वेगाडी खाली आल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. मृताचे नाव पंकज असून तो मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. तो स्टेशनवर कॅन्टीनमधील समोसा, वडापाव विक्रीचे काम करत असल्याची माहिती आहे.
माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी, आर.पी.एफचे जवान तातडीने घटनास्थळी धावून आले.दरम्यान या घटनेचा अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.मृताचे नाव पंकज असून मूळ उत्तरप्रदेशचा आहे.गेल्या काही दिवसापासून तो परळी रेल्वे स्टेशन मध्ये वडापाव समोसे विक्रीचे काम करीत असल्याचे माहिती परळी रेल्वे पोलीस जमादार सय्यद यांनी दिली.
बातमी शेअर करा