Advertisement

...तर आम्ही टोलनाके जाळून टाकू

प्रजापत्र | Monday, 09/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रविवारी म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत कडाडून हल्ला चढवला. फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशाराच राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला.

 

 

टोल हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा

राज ठाकरे यांनी आज आपले निवासस्थान शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज्यातील टोलवसुलीवर अनेक राजकारण्यांचे उदरनिर्वाह होत आहे. अनेकांना या टोलवसुलीतून दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला पैसे मिळतात. त्यामुळे हे नेते कधीही चांगले रस्ते होऊ देणार नाही. प्रत्येक टोलनाक्यावरुन किती टोलवसुली होत आहे? कधीपर्यंत टोलवसुली केली जाणार आहे? याचा हिशेब झालाच पाहीजे, असे राज ठाकरे म्हणाले.
 

Advertisement

Advertisement